You are currently viewing जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरु

जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरु

 सिंधुदुर्गनगरी

सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त कार्यरत असलेल्या शासकीय मुलांचे वसतिगृह, मालवण, कणकवली व वेंगुर्ला तसेच मुलीचे शासकीय वसतिगृह मालवण, कणकवली, वेंगुर्ला, सावंतवाडी, देवगड या ठिकाणी सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्याना शासकीय वसतिगृहात रिक्त असलेल्या जागावर मोफत प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त दीपक घाटे यांनी दिली आहे.

शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांना उत्कृष्ठ निवास व भोजन, अंथरूण-पांघरूणची सुविधा, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, ग्रंथालय, मनोरंजन कक्ष, जिम, अभ्यासक्रमासाठी संगणकासह इंटरनेट वाय-फाय आदी सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येतात. तरी गरजू मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी प्रवेशाबाबतचे ऑफलाईन (मॅन्युअली) अर्ज संबंधित तालुक्याच्या वसतिगृहातील गृहपाल यांच्याकडून प्राप्त करून आवश्यक कागदपत्रांसह शासकीय वसतिगृहात जमा करावेत.

अधिक माहितीसाठी संबंधित गृहपाल संतोष जाधव (तालुका कणकवली व देवगड) मो.नं. ९४२१४३०२०६. कुणाल इंदलकर (तालुका- मालवण व सावंतवाडी) – मो. नं. ८००७०५२३४२ व. गोरक्षनाथ जाधव (तालुका- वेंगुर्ला) – मो. न. ९४०५८४८५०९ किंवा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क (०२३६२-२२८८८२) साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यानी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा