जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी प्रवीण उर्फ जी आर जोशी यांची अप्रतिम लावणी
दिलबरा कशाला इतकी घाई
राजसा रात सरली नाही।। धृ ।।
रंग बिलोरी आरस्पानी
बहरते कोवळी अंगी ज्वानी
नभी उगवली चंद्र चांदणी
देईन मी सर्व काही
राजसा रात सरली नाही
बसा मंचकी देते मी विडा
इश्काचा त्यात कात केवडा
गोड गुलाबी कोड सोडा
गुपित सांगा की काही
श्रावण बरसे घन चिंब रात
चेतवली मी वनी फुलवात
टपोरा गजरा माळा की हो डोई
राजसा बरी नव्हे ही घाई
महिरपी दरबारी शेज सजली
तुमच्या प्रेमाची शाल पांघरली
दरवळली ती जाई जुई
सुगंध लुटा की बाई
राजसा रात सरली नाही
प्रो डॉ जी आर जोशी
अंकली बेळगाव
कॉपी राईट