मुंबई :
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात पुरत्या अडकलेल्या रिया चक्रवर्तीच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सुशांत प्रकरणात तुरुंगात असलेल्या रिया चक्रवर्तीच्या न्यायलयीन कोठडीत २० ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान रिया आणि शौविक यांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने दोघांचाही जामीन अर्ज फेटाळला. या आधीही न्यायालयाने दोन वेळा रियाचा जामीन अर्ज फेटाळला होता.
तत्पूर्वी, रिया चक्रवर्तीच्या न्यायलयीन कोठडीत ६ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली होती. दरम्यान रिया आणि शौविक यांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने दोघांचाही जामीन अर्ज फेटाळला. या आधीही न्यायालयाने दोन वेळा रियाचा जामीन अर्ज फेटाळला होता. जर या प्रकरणी रिया दोषी आढळल्यास तिला १० वर्षांची शिक्षा होऊ शकते. ८ सप्टेंबर रोजी रियाला अटक केल्यानंतर तिची रवानगी भायखळा तुरुंगात करण्यात आली होती.
रिया सध्या भायखाळा तुरूंगात बंद आहे. तर रिया आणि शौविकने अनेक वेळा न्यायालयात जामिन याचिका दाखल केली होती. मात्र प्रत्येक वेळा कोर्टाने त्यांची जामिन अर्ज फोटाळला आहे.