You are currently viewing गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांना: व्दारकानाथ शेंडे साहित्य पुरस्कार जाहीर…

गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांना: व्दारकानाथ शेंडे साहित्य पुरस्कार जाहीर…

 

कासार्डे: दत्तात्रय मारकड

 

महाराष्ट्रातील आघाडीचे गझलकार जिल्ह्याचे सुपुत्र मधुसूदन नानिवडेकर यांना चिपळून येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मन्दिराकडून देण्यात येणारा व्दारकानाथ शेंडे सहित्य पुरस्कार जाहिर झाला आहे. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मन्दिरचे अध्यक्ष अरुण इंगवले आणि कोषाध्यक्ष सुनिल खेडेकर यांनी ही घोषण केली. या पुरस्काराबद्दल मधुसूदन नानिवडेकर यांचे अभिनंदन होत आहे. सन्मानचिन्ह, उपरणे आणि दहा हजर रुपये रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

 

वाशी (मुंबई) येथे झालेल्या नवव्या अखिल भारतीय गझल संमेलनाचे ते अध्यक्ष होते. सिंधूड़रग जिल्ह्यातील नानिवडे गाव असलेल्या नानिवडेकर यांची महाराष्ट्रात नामवंत गझलकार म्हणून प्रसिध्द आहेत. चांदणे नदीपात्रात हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिध्द झाला असून विद्यापीठात अभ्यासक्रमासाठी संदर्भ ग्रंथ म्हणून अभ्यासला जातो.

 

संपुर्ण महाराष्ट्रात गझल कार्यक्रमात टाळ्यांच्या कडकडाटात नानिवडेकर यांच्या गझलांनी प्रतिसाद मिळतो. महाराष्ट्रात विविध ठिकाणी गझल कार्यशाळेत नानिवडेकर मार्गदर्शन करतात. गझल मधील महत्वाचा यू आर एल फाऊंडेशनचा पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे.

 

साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. दैनिक पुढारी मध्ये काही काळ उप संपादक म्हणून काम केले असून सध्या ते महाराष्ट्र टाईम्स चे सिंधुदुर्ग जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करीत आहेत. सुप्रसिध्द गझल गायक भीमराव पांचाळे यांनी नानिवडेकर यांच्या अनेक गझला विविध कार्यक्रमात गायल्या आहेत. व्दारकानाथ शेंडे सहित्य पुरस्कार देऊन गौरविण्याचे भाग्य आम्हाला लाभले यबद्दल लोकमान्य टिळक स्मारक वाचन मन्दिरचे अध्यक्ष अरुण इंगवले आणि कोषाध्यक्ष सुनिल खेडेकर यांनी आनंद व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा