You are currently viewing जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन

जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन

जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, 

 सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा च्या माध्यमातून आरक्षित जागेवर प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रामणपत्र सादर करणे अनिर्वाय करण्यात आले आहे.

जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी नियमानुसार समितीकडे अर्ज केल्यानंतर सामान्यत: तिन महिन्यांच्या आत वैधता प्रमाणपत्र बाबत समिती निर्णय घेते. वैधता प्रमाणपत्र  देण्यासासाठी समितीस पुरेसा अवधी मिळावा. तसेच जात वैधता प्रमाणपत्रा अभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळणेपासून वंचित राहू नये.

            ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्याप वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर केलेला नाही.त्यांनी ज्या जिल्ह्यातून जातीचा दाखला प्राप्त केलेला आहे. त्या जिल्ह्याच्या  जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी त्वरित अर्ज करावा, असे आवाहन धम्मज्योती गजभिये महासंचालक, बार्टी तथा मुख्य समन्वयक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा