कृषी योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
कृषी विभागाचे योजना अनेक अर्ज एक कार्यपध्दती अंतर्गत कृषी यांत्रिकरण व विविध योजनांचे लाभ घेणेसाठी महाडिबीटी प्रणाली व्दारे ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.शेतकऱ्यांनी आपले नजिकच्या महा ई-सेवा केंद्रामार्फत अथवा कृषि विभागामार्फत विकसित केरण्यात आलेल्या महाडिबीटी ॲपव्दारे स्वत:चा युजर आयडी व पासवर्ड बनवून आपल्याला हव्या असलेल्या घटक यंत्राकरिता अर्ज करावयाचे आहे. अर्ज करतेवेळी शेतकऱ्यांनी आपला नजिकच्या कालावधीतील 7/12 उतारा, 8अ , आधारकार्ड व आपले आधारकार्ड नंबरशी लिंक मोबाईल नंबर व बँक खाते नंबरची माहिती ऑनलाईन सादर करावयाची आहेत. ज्या घटक, यंत्राचे लाभाकरिता शेतकऱ्याने अर्ज केलेला आहे त्यांची ऑनलाईन सोडत होत.
त्याप्रमाणे त्याचे पुढील कार्यवाही करण्याकरिता संबंधित शेतकरीऱ्यांना त्यांचे मोबाईलवर वेळोवेळी संदेश प्राप्त होतो व त्या संदेशाप्रमाणे शेतकऱ्यांनी आपली कार्यवाही करावयाची आहे. सोडत प्राप्त शेतकऱ्यांनी यंत्र अवजारासाठी आवश्यक 7/12, 8अ उतार, ऑनलाईन अर्जात नमुद घटक, यंत्राचे अधिकृत विक्रेत्याकडिल कोटेशन, टेस्ट रिपोर्ट ऑनलाईन सादर करावयाचे आहे. कागदपत्राची ऑनलाईन छाणणी झाले नंतर, यंत्र खेरदी पुर्वसंम्मती प्रदान केली जाते. पुर्व संम्मती प्राप्त झालेनंतरच शेतकऱ्यांनी 30 दिवसाचे आत यंत्र अवजार खरदी करुन अनुदानासाठी आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन करावयाची आहेत व त्यानंतर या विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांचेकडून यंत्र अवजाराची मोका तपासणी झालेनंतर डिबीटी प्रणाली व्दारे अनुदान शेतकऱ्याचे बँक खाती थेट जमा होते. पूर्व संम्मती प्राप्त होणेचे अगोदर यंत्र अवजाराची खरेदी करण्यात येऊ नये. अन्यथा यंत्र अवजारांना अुनदान मिळू शकणार नाही.
सर्व प्रक्रिया ही ऑनलाईन असल्याने,यासाठी लेखी अर्ज अथवा कागदपत्रे कार्यालयाला सादर करावयाची आवश्यकता नाही . तरी या योजनेच्या अधिक माहितीसाठी क्षेत्रिय स्तरावरील कृषि सहायक कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी यांना संपर्क साधण्याचे आवाहन तालुका कृषि अधिकारी सावंतवाडी यांनी केले आहे.