सावंतवाडी :
तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेले अस्थिरोगतज्ज्ञ निखिल अवधूत उद्या सायंकाळी ४ ते ७ या वेळेत ‘जनता क्लिनिक’ येथे रुग्णांची तपासणी करणार आहेत. डॉक्टर अवधूत यांनी एमबीबीएस डी- आर्थो ही पदवी प्राप्त केली आहे.
गेले काही महिने उपजिल्हा रुग्णालयात अस्थी विकारांवर रुग्णांना डॉक्टर अवधूत हे उपचार देत आहेत. यात संधिवात, मान दुखी, कंबर दुखी, मणक्याचे आजार आदी आजारांवर त्यांनी यशस्वी उपचार केले आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी अतिशय माफक दरात रुग्णांची तपासणी केली जाणार आहे.
गांधी चौक परिसरातील जनता मेडिकलच्या शेजारी हे क्लिनिक असून जास्तीत जास्त अस्थी विकार रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर अवधूत यांनी केले आहे. नाव नोंदणी साठी ९९७५४३४८४६ / ९७११९९६९७४ या नंबर वर संपर्क साधावा.