कुडाळ / पूनम राटुळ :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व लाखो सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांच्या निवृत्ती वेतन व आर्थिक देयकाबाबत जी परवड चालली आहे ती खेदजनक बाब असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ शिक्षक नेते तथा सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष सावळाराम अणावकर यांनी दिली.
ज्या गुरुजींनी तुम्हास वैचारिक संस्कार दिले त्या या शिल्पकार आपत्ती अशी उपेक्षा कुणामुळे होते असा सवाल त्यांनी केला अनेक असाध्य आजाराने सेवानिवृत्त शिक्षक त्रस्त झाले आहेत त्यांची आर्थिक देणे किंवा जीवन वेतन म्हणून मिळणारे निवृत्तीवेतन वेळी का मिळत नाही याबाबत संबंधित शासन प्रशासन मानवी सहिष्णुतेने गंभीरपणे पाहणार नसेल तर वय आजार विसरून आयुष्याच्या उत्तरार्धात सेवानिवृत्त गुरुजींनी रस्त्यावर यावे असे कुणाला भूषणावह वाटते त्यामुळे आमचे हक्काचे पैसे आमच्या अखेरच्या आजार गरजेच्या वेळेस दिले जावे अशी मागणी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ग्रामविकास मंत्री यांच्याकडे केली आहे.