कुडाळ
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन कुडाळ तालुक्यातील गोठोस गावात उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे च्या ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव च्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण दिनाचे आयोजन केले होते.
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. संदीप गुरव होते. प्रमुख अतिथी डॉ. गिरीश उईके तसेच ग्रामसेवक गुरुनाथ गावडे, कृषी सहाय्यक धनंजय कदम, कृषी पर्यवेक्षक सौ. परब व प्रगतशील शेतकरी विष्णू ताम्हाणेकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमासाठी गावातील प्रगतशील शेतकऱ्यांची उपस्थिती लाभली. सर्वांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करुन पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. मान्यवरांनी या प्रसंगी आपले विचार मांडले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी कु. विश्वेन्द्र गुप्ता,कु. कौस्तुभ भावे, कु. ओमकार सावंत,कु.अनिकेत देसाई, कु. शैतान सिंग मीना आणि कु. मनोज कुमार काला यांनी मेहनत घेतली.
