भारतीय टपाल विभाग तर्फे तिमिरातुनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते, श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांचे टपाल तिकीट (MY STAMP) प्रकाशित करण्यात आले
कोकण तसेच संपूर्ण महाराष्ट्रात तिमिरातुनी तेजाकडे ही अभिनव शैक्षणिक चळवळ राबवून शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव तसेच त्याद्वारे निर्माण होणारे प्रशासकीय स्वराज्य घडविण्याच्या अनुषंगाने निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्याने आयोजित केली जातात. लवकरच निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा व्याख्यानांचे शतक पूर्ण होणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये तसेच पालकांमध्ये स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत समाज प्रबोधनाद्वारे नवचैतन्य व जागरूकता निर्माण करण्याचे कार्य उच्च पातळीवर सुरू आहे. महाराष्ट्रातील विविध प्रवर्गातील उमेदवार यांचे विविध पदांवर निवड होण्यासाठी सर्वतोपरी निशुल्क मार्गदर्शन व अन्य सेवांची उपलब्धता तिमिरातुनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळी द्वारे केली जात आहे.
या शैक्षणिक तसेच सामाजिक कार्याचा उचित गौरव म्हणून ७ जून २०२२ रोजी श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांच्या नावाचा उल्लेख सहित टपाल तिकीट (MY STAMP) चे प्रकाशन करण्यात आले. सदर पोस्टाचे तिकीट विश्व टपाल तिकीट प्रदर्शनी तसेच पोस्टल म्युझियम मध्ये सुद्धा ठेवले जाईल असे प्रतिपादन विश्व शांतिदूत डॉ. सुधीर तारे यांच्या हस्ते श्री सत्यवान रेडकर यांना टपाल तिकीट (MY STAMP) प्रदान करताना करण्यात आले. यावेळी डॉ. माई देशमुख सुद्धा उपस्थित होते.