वेंगुर्ला :
परुळे येथील श्री देव आदिनारायण विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी नीलेश दत्तात्रय सामंत,तर व्हाईस चेअरमनपदी प्रसाद पाटकर यांची बिनविरोध निवड झाली. पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात भाजप प्रणित सहकार गाव विकास पॅनलने १३-० असा विजय मिळवला.
निलेश सामंत, प्रसाद पाटकर ,शंकर राठीवडेकर ,साईनाथ माडये ,प्रकाश चव्हाण, विठोबा राणे ,विठोबा मेस्त्री ,महादेव सापळे, सुवर्णा सावंत, मनीषा दुधवडकर ,संतोष परुळेकर, सहदेव कदम, जानू बुट्टे हे १३पैकी १३ उमेदवार भाजप पुरस्कृत विजयी झाले.
चेअरमन -व्हाईस चेअरमन निवडणुकी प्रसंगी माजी सभापती नीलेश सामंत ,माजी चेअरमन प्रकाश राणे, विरसेन देसाई, परुळे सरपंच श्वेता चव्हाण ,पुरुषोत्तम प्रभू, प्राजक्ता चीपकर, सुनील चव्हाण, संतोष करलकर, रुपेश राणे, शेखर राणे ,गणपत माधव ,भाऊ परूळेकर, तात्या पवार, सीमा सावंत, रक्षिता गोवेकर, बाळा नानचे, सदा पार्सेकर ,दया तेली ,सुधीर पेडणेकर, पोलिस पाटील सुभाष घोलेकर ,मंगेश माडये ,बाळा राऊळ, दया तेली, सोसायटी सचिव सावंत ,निवडणूक अधिकारी प्रशांत साळगावकर यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.