You are currently viewing प्रकाश पाणदरे यांचेकडून उमेदला २५ हजार रूपयांचा हातभार…

प्रकाश पाणदरे यांचेकडून उमेदला २५ हजार रूपयांचा हातभार…

बांदा

शालेय गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देऊन विद्यार्थ्यांचे दातृत्व स्विकारत असलेल्या उमेद फौंडेशनला बांदा येथील सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश रघुनाथ पाणदरे यांनी पंचवीस हजार रुपयांची मदत उमेद देऊन गरजू मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्विकारले आहे.
सध्या कोरोनच्या पार्श्वभूमीवर अनेक पालकांची आर्थिक स्थिती बिकट झाली असून शाळा चालू झाल्यावर अनेक मुलांना शैक्षणिक साहित्यही मिळणे मुस्कील होईल यासाठी उमेदने शैक्षणिक पालकत्व ही मोहिम हाती घेतली आहे. त्याच बरोबर गरजू व अनाथ मुलांना शिक्षण प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी उमेदच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. उमेदच्या कार्याला हातभार लावण्यासाठी प्रकाश पाणदरे व व त्यांच्या पत्नी सौ.उषा पाणदरे यांनी उमेदियन जे.डी.पाटील व सौ स्वाती पाटील यांचेकडे २५ हजार रुपयांचा चेक सुपुर्द केला.
मुळचे सातारा येथील असणारे पाणदरे सर यानी २६ वर्ष बांदा येथे तर ८ वर्ष कुडासे ज्युनिअर काॅलेजला नोकरी करून सेवानिवृत्त झाले आहेत. सध्या बांदा येथील नट वाचनालयाचे ते संचालक आहेत. यापूर्वी त्यांनी केरळ येथील महापूर, मागील वर्षी आलेला कोल्हापूर सांगली येथील महापूर, संविता आश्रम कुडाळ, बांदा नट वाचनालय, केंद्रशाळा बांदा यांना आर्थिक मदत करुन आपल्या दातृत्वाचा आदर्श निर्माण केला आहे. पाणदरे सर यांनी आपल्या सेवानिवृत्ती नंतर मिळणारी पेन्शन गरजू व आपत्कालीन परिस्थितीवेळी वाटप करून समाजप्रेम व दात्वृत्वाचा वेगळा आदर्श निर्माण केल्याबद्दल उमेद फौंडेशनचे अध्यक्ष प्रकाश गाताडे, माजी सहाय्यक शिक्षण संचालक संपत गायकवाड, उमेदियन जे.डी.पाटील, प्रदिप नाळे, स्वाती पाटील तसेच उमेद परिवाराच्या वतीने पाणदरे कुटुंबियांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा