कणकवली तालुका माजी सभापती श्री तुलसीदास रावराणे, संस्था सचिव श्री अर्जुन रावराणे, अधिक्षक श्री.जयेंद्र रावराणे यांची प्रमुख उपस्थिती
वैभववाडी
वैभववाडी तालुक्यातील कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. कु.चित्रा प्रभू या विद्यार्थ्यांनी ने वाणिज्य शाखेत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विज्ञान शाखेमधून कु.सायली सुरेश जांभवडेकर कु.दिव्या दत्ताराम गुरव ,कु.डिंपल प्रकाश माने या विद्यार्थिनीने यश प्राप्त केले.
वाणिज्य शाखेमधून कुमारी चित्रा प्रदीप प्रभू , कु.तुषार चंद्रकांत पार्टे ,कु. सानीया सुरेश मोरे विद्यार्थिनीने यश प्राप्त केले.
कला शाखेतून कु.सलोनी संतोष पवार , कु. श्वेता सुरेश सावंत ,कु.तन्वी रमेश पवार या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे वैभववाडी तालुका शिक्षण संस्था व प्रशालेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अधिक्षक तथा स्थानिक अध्यक्ष श्री.जयेंद्र रावराणे,कणकवली तालुका माजी सभापती तुलसीदास रावराणे, संस्था सचिव अर्जुन रावराणे, मुख्याध्यापक नादकर बी.एस., प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी ,पालक विद्यार्थी उपस्थित होते.