सावंतवाडी :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेत चौकूळ सारख्या एका दुर्गम गावात गेली तीनही वर्षें सतत १०० टक्के निकाल देऊन हॅट्ट्रिक घेतली आहे.
चौकूळ सारख्या दुर्गम खेडेगावी कनिष्ठ महाविद्यालय सुरु करून तेही स्वयं अर्थ सहायित माध्यमातून चालवीण्याचे अतिशय अवघड काम सेवानिवृत्त प्राध्यापक मधुकर गावडे उर्फ आबा आणि त्यांची समविचारी टिम, समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीने, करते आहे.
आजचे यशस्वी विध्यार्थी बारावीचा महत्वाचा टप्पा पार करून पुढील वाटचालीस सिद्ध झाले आहेत.
त्यातील निवडक गुणवंत पुढील प्रमाणे :
*कला शाखा*
रसिका रामचंद्र गावडे ८५%
दिपाली गावडे ६८.६७%
ऋतिक चंद्रकांत गावडे ६५.३३%
*वाणिज्य शाखा*
पूर्वा बाबुराव गावडे ८२.६७%
प्राची प्रभाकर परब ८१.३३%
श्रद्धा सुधाकर राऊळ ७९.१७%
यशस्वी विध्यार्थी, त्यांचे पालक, सर्व शिक्षक वर्ग आणि त्यांच्यामागे तन, मन आणि धन या माध्यमातून उभे राहिलेले मधुकर आबा आणि त्यांची टिम या सर्वांचे समाजाच्या सर्वच थरातून अभिनंदन होत आहे.