You are currently viewing सांगेली येथील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाची एच.एस.सी परीक्षेत शंभर(१००%) टक्के निकालाची परंपरा कायम..

सांगेली येथील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाची एच.एस.सी परीक्षेत शंभर(१००%) टक्के निकालाची परंपरा कायम..

संस्था आणि मुख्याध्यापकांनी केले यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन

सावंतवाडी

सांगेली येथील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचा एच एस सी परीक्षेचा विज्ञान, कला व वाणिज्य या तिन्ही शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या महाविद्यालयातून परीक्षेला बसलेले विज्ञान (६०), कला (१२), वाणिज्य (३८) या सर्व शाखेतील एकूण ११० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात विशेष प्रावीण्य श्रेणीत २, प्रथम श्रेणीत ७३ तर तृतीय श्रेणीत ३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या उच्च माध्यमिक विद्यालयाने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.
या महाविद्यालयाचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे विज्ञान विभाग- प्रथम अक्षता रामचंद्र लातये ( ७५.५० टक्के), द्वितीय सानिका शैलेंद्र राऊळ ( ७५.३३ टक्के), तृतीय श्रावणी सुनिल सावंत ( ७३.५० टक्के), कला विभाग प्राजक्ता अजित क (६८.५० टक्के), द्वितीय अनिरुद्ध मोहन घोगळे (५८.१७ टक्के ), तृतीय प्रशांत प्रविण सावंत (५७.६७ टक्के), वाणिज्य- प्रथम वैष्णवी संतोष राऊळ ( ६७.५० टक्के), द्वितीय दिशा शांताराम राणे ( ६५.८३ टक्के ), तृतीय (संयुक्त) अभिषेक संजय रेमुळकर आणि लतिकेश रामदास मेस्त्री संयुक्त (६५ टक्के) सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ पू राउळ, सचिव विश्वनाथ राउळ प्रशालेचे मुख्याध्यापक प्राचार्य रामचंद्र घावरे आणि शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा