You are currently viewing हिम्मत जाधव यांचे राज्यस्तरीय रायफल शुटिंग स्पर्धेमध्ये घवघवीत यश

हिम्मत जाधव यांचे राज्यस्तरीय रायफल शुटिंग स्पर्धेमध्ये घवघवीत यश

पश्चिम बंगाल – दिल्लीतील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

इचलकरंजी येथील प्रकाश आवाडे क्रीडा अकॅडमीचे खेळाडू व पुणे शूटर क्लबचे शूटर हिम्मत जाधव यांनी महाराष्ट्र राज्य रायफल असोसिएशनच्या वतीने वरळी, मुंबई येथे घेण्यात आलेल्या कॅप्टन ईझ्झिकल राज्यस्तरीय चॅम्पियनशिप ५० मीटर.२२ कॅलिबर रायफल प्रोन पोझिशन स्पर्धेत पहिल्याच मॅचमध्ये ६०० पैकी ५४५ इतका स्कोअर करून घवघवीत यश संपादन केले.त्यामुळे त्यांची पश्चिम बंगाल व दिल्ली येथे होणा-या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

हिम्मत पाटील हे इचलकरंजी येथील प्रकाश आवाडे क्रीडा अकॅडमीचे खेळाडू व पुणे शूटर क्लबचे शूटर म्हणून सराव करत विविध स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करत आहेत.नुकताच महाराष्ट्र राज्य रायफल असोसिएशनच्या वतीने वरळी, मुंबई येथे कॅप्टन ईझ्झिकल स्टेट लेव्हल चॅम्पियनशिप ५० मीटर.२२ कॅलिबर रायफल प्रोन पोझिशन स्पर्धा पार पडल्या.यामध्ये त्यांनी पहिल्याच मॅचमध्ये ६०० पैकी ५४५ इतका स्कोअर करून घवघवीत यश संपादन केले
सदर स्पर्धेमध्ये हिम्मत जाधव यांना मिळालेल्या घवघवीत यशामुळे पश्चिम बंगाल येथे होणाऱ्या वेस्ट झोन रायफल शूटिंग कॉम्पिटिशन व दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय रायफल
शूटिंग कॉम्पिटिशनमध्ये स्मॉल बोअर रायफल व बिग बोअर रायफल कॅटॅगिरीमध्ये खेळण्याची त्यांना सुवर्णसंधी मिळाली आहे. तसेच शांतीनिकेतन, सांगली येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय खुल्या रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये सिल्व्हर मेडल मिळवून त्यांनी इचलकरंजी शहराच्या यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. त्यांच्या या यशामध्ये प्रशिक्षक पृथ्वीराज रणजितसिंग जगदाळे यांचे मोलाचे मार्गदर्शन ठरले.इचलकरंजी शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच रायफल शुटींग स्पर्धेत घवघवीत यश संपादन करत राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत मजल गाठून साध्य केलेल्या या
यशाबद्दल त्यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा मोठा वर्षाव होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा