कुडाळ :
कुडाळ तालुक्यातील एस. आर. पाटील कनिष्ठ महाविद्यालय पाट प्रशाळेतून मार्च एप्रिल २०२२ मध्ये झालेल्या इ.१२वी परीक्षेत तिन्ही शाखेत २४५ विद्यार्थी बसले होते त्यापैकी २४० उत्तीर्ण होऊन निकाल ९७.९५ टक्के लागला.
कला विभागात- एकूण ३१विद्यार्थी बसले पैकी २८ उत्तीर्ण निकाल ९०.३२%
विज्ञान विभागात- एकूण ६७ विद्यार्थी बसले पैकी ६७ उत्तीर्ण निकाल १००%
वाणिज्य विभागत- एकूण १४७ विद्यार्थी बसले पैकी १४५ उत्तीर्ण निकाल ९८.६३%
कला विभागातील कू. उसपकर साहिल संजय ७८.८३% प्रथम, कु. पाटकर स्नेहा समाधान ६७.००% द्वितीय, कु. सातार्डेकर यश दिनेश ५९.३३% तृतीय क्रमांकावर आहे.
वाणिज्य विभागातील कु. सावंत निकिता सुरेश ८८.३३% प्रथम, कु. कोरगांववकर सुशांती अर्जुन ८२.८३% द्वितीय, तर कु.तेंडोलकर चैतन्य चारुदत्त ८०.६७% तृतीय क्रमांक पटकावले आहे.
विज्ञान विभागातील कु. मेस्त्री गायत्री संदीप ९०.१७% प्रथम, कु. चव्हाण पलक शंकर ८०.५०% द्वितीय, तर कु. तळवडेकर विनित प्रशांत ७८.५०% तृतीय क्रमांकावर पटकावला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संचालक, प्र.मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.