You are currently viewing क्रीडा सुविधा निर्मितीसाठी अर्थसहाय्य योजनेंतर्गत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

क्रीडा सुविधा निर्मितीसाठी अर्थसहाय्य योजनेंतर्गत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

दर्जेदार क्रीडा सुविधा निर्माण करून त्याद्वारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडावेत या उद्देशाने शासनाने क्रीडा सुविधा निर्मितीसाठी अर्थसहाय्य योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत क्रीडा सुविधा निर्मितीसाठी व साहित्य खरेदीसाठी शैक्षणिक संस्था, खाजगी क्लब, क्रीडा मंडळे, प्राधकरणे, स्थानिक स्वराज्य संस्था यांना अर्थसहाय्य देण्यात येते. त्यामध्ये क्रीडांगण विकसित करणे, बंदिस्त प्रेक्षागृह उभारणे, क्रीडा सुविधा तयार करणे, विविध खेळांचे टिकाऊ व अटिकाऊ क्रीडा साहित्य खरेदी करणे यासाठी अनुदान देण्यात येते.

            या योजनेसाठी संस्थांनी विहीत निमुन्यातील प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे सादर करावेत. अधिक माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या diosindhudurg.blogspot.in या ब्लॉगवर उपलब्ध असून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा