तहसीलदार रामदास झळके यांना ग्रामस्थांचे निवेदन
वैभववाडी
खड्डेमय झालेल्या लोरे – गडमठ रस्त्याची तात्काळ डागडुजी करण्यात यावी. या मागणीचे निवेदन गडमठ ग्रामस्थांनी तहसीलदार रामदास झळके यांच्याकडे दिले आहे. लोरे – गडमठ हा रहदारीचा रस्ता पुर्णतः खड्डेमय झाला आहे. संबंधित प्रशासनाने या पाच किमीच्या रस्त्याकडे पूर्णता दुर्लक्ष केले आहे. रस्त्यात मोठमोठे खड्डे असल्याने प्रवाशी व वाहनचालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
परिसरातील मुले सायकलने शाळेत ये -जा करतात. परंतु या खड्ड्यांचा सामना विद्यार्थ्यांना देखील करावा लागत आहे. खड्डेमय रस्त्याची डागडुजी न केल्यास अतिवृष्टीत रस्ता ठिकठिकाणी खचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा फटका शालेय विद्यार्थ्यांना व आजारी व्यक्तींना देखील बसणार आहे. त्यापूर्वी संबंधित रस्त्याची तात्काळ डागडुजी करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतेवेळी राजेंद्र कदम, अमित शेटे, गजानन सावंत, नारायण दळवी, किशोर सुतार रवींद्र सुतार आदी उपस्थित होते.