९७.२१ टक्के निकाल ; राज्याचा एकूण निकाल ९४.२२ टक्के…
सिंधुदुर्गनगरी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात कोकण विभागाने पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे कोकण विभागाचा निकाल ९७.२१ टक्के निकाल लागला. तर राज्याचा निकाल हा ९४.२२ टक्के इतका लागला आहे.
२०२१ मध्ये बारावी उत्तीर्णतेची टक्केवारी ९९.६३ टक्के इतकी होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण विभागाने या निकालात बाजी मारली आहे. तर मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
राज्याचा बारावीचा एकूण निकाल ९४.२२ टक्के लागला असून यामध्ये मुलींचा निकाल ९५.३५ टक्के इतका तर मुलांचा निकाल ९३. २९ टक्के लागला आहे. ४ मार्चपासून सुरु झालेल्या बारावीच्या परीक्षेला राज्यात एकूण १४ लाख ८५ हजार ८२६ इतके विद्यार्थी बसले होते. बारावीची परीक्षा ४ मार्च २०२२ ते ३० मार्च २०२२ या कालावधीत ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली होती.
विभागवार निकाल खालीलप्रमाणे :
कोकण विभाग ९७.२१ टक्के
पुणे: ९३.६१
नागपूर: ९६.५२
औरंगाबाद: ९४.९७
मुंबई: ९०.९१
कोल्हापूर: ९५.०७
अमरावती: ९६.३४
नाशिक: ९५.०३
लातूर: ९५.२५
दुपारी एक वाजता या संकेतस्थळांवर निकाल उपलब्ध होणार आहे. तर विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये १७ जून गुणपत्रिका दिल्या जाणार आहेत.
पुढील वेबसाइट्सवर पाहता येईल निकाल :
1) www.mahresult.nic.in
2) www.hscresult.mkcl.org
3) http://hsc.mahresults.org.in