You are currently viewing सापडलेल्या बाळाच्या नातेवाईकांना संपर्काचे आवाहन

सापडलेल्या बाळाच्या नातेवाईकांना संपर्काचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्गनगरी येथे सापडलेल्या बाळाच्या नातेवाईकांनी भारतीय समाज सेवा केंद्र, चिपळूण किंवा जिल्हा बाल कल्याण समिती, रत्नागिरी येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा बालसंरक्षण अधिकारी विश्वनाथ कांबळी यांनी केले आहे.

            मु.पो. मुणगे, ता. देवगड येथील सुप्रिया लऊ निकम या दि. 21 डिसेंबर 2021 रोजी सायं. 4.45 वा. जिल्हा रुग्णालय ओरोस येथे आपले बाळ पायल लऊ निकम हिला ठेऊन पळून गेल्या. ही बाब जिल्हा रुग्णालय ओरोस येथील कर्मचारी यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी बाल कल्याण समिती सिंधुदुर्ग यांना याबाबत कळविले. त्यानंतर बाल संरक्षण समिती सिंधुदुर्ग यांच्या आदेशाने काळजी व संरक्षणाच्या दृष्टीने या बाळाचा ताबा घेऊन दि. 6 जून 2022 रोजी बाल कल्याण समिती, रत्नागिरी यांच्या आदेशाने भारतीय समाज सेवा केंद्र, चिपळूण येथए दाखल करण्यात आले. या बालिकेचे जर कोणी नातेवाईक असतील तर त्यांनी बाल कल्याण समिती, रत्नागिरी किंवा भारतीय समाज सेवा केंद्र चिपळूण यांच्याशी संपर्क साधावा. ही बातमी प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसांच्या आत बालिकेवर हक्क शाबित करणारे कोणी आले नसेल तर हे बाळ बेवारस म्हणून घोषित करण्यात येईल व त्याचा पुढील पुनर्वसणासाठी संस्था प्रयत्न करणार असल्याची माहिती जिल्हा बालसंरक्षण अधिकारी श्री. कांबळी यांनी दिली.

            संपर्कासाठी पत्ता – भारतीय समाज सेवा केंद्र, चिपळूण, रामतीर्थ तलावासमोर, शंकरवाडी रोड, मार्कंडी, चिपळूण – दूरध्वनी क्र. 02355-255057, जिल्हा बाल कल्याण समिती, रत्नागिरी, अभ्यंकर आणि पानवलकर निरीक्षण गृह, जिल्हा रत्नागिरी.

प्रतिक्रिया व्यक्त करा