वेंगुर्ला :
तुळस ग्रामदेवता श्री देवी जयंती उत्सवाची सांगता बुधवार, ८ रोजी कवळास उत्सवाने होणार आहे. श्री देव जयंती उत्सव सलग ११ दिवस चालतो. या उत्सवाला यावर्षी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. महोत्सवाच्या पाचव्या दिवशी श्री देव गाव फिरून आल्यावर श्री देव अवसारी नजीकच्या सर्व मंदिरात जाऊन देवाची भेट घेतो व नंतर बोलतो. त्या अगोदर तो मूक असतो. देव बोलता झाल्यावर लोकांची गाऱ्हाणी ऐकून निराकरण करणे. भूत, पिशाच्यादी बादा झालेल्यांना मुक्त करतो. पाचव्या दिवसापासून दररोज श्रीदेव लवाजम्यासह संपूर्ण गावात कवळसापर्यंत रात्री प्रत्येकाचे घरी दर्शन देतो. यावेळी घरातील लहान थोर मंडळी देवाची पूजा करून नैवेद्य दाखवतात व आशीर्वाद घेतात. कवळसाने या उत्सवाची सांगता होते.