You are currently viewing राज्यस्तरीय गणित प्रज्ञा परीक्षेत बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांची चमक

राज्यस्तरीय गणित प्रज्ञा परीक्षेत बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांची चमक

बांदा

महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळ यांच्या वतीने एप्रिल २०२२मध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय गणित प्रज्ञा परीक्षेत जिल्हा परिषद बांदा नं. १ केंद्रशाळेतील इयत्ता पाचवीतील विद्यार्थीनी कनिष्का राजन केणी व किमया संतोष परब या दोन्ही विद्यार्थीनींनी राज्यस्तरीय प्रज्ञा परीक्षेत सुयश प्राप्त करुन शिष्यवृत्ती ,मेडल व प्रमाणपत्रधारक होण्याचा मान मिळवला आहे. दरवर्षी महाराष्ट्र राज्य व सिंधूदुर्ग जिल्हा गणित मंडळ यांच्या वतीने गणित संबोध ,गणित प्रावीण्य व गणित प्रज्ञा या परीक्षेचे इयत्ता पाचवी व आठवीसाठी आयोजन करण्यात येते .संबोध व प्राविण्य परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणार्या विद्यार्थ्यांना प्रज्ञा या राज्यस्तरीय परीक्षेला बसण्याची संधी प्राप्त होते. या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक जे.डी.पाटील ,सरोज नाईक ,उर्मिला मोर्ये , रसिका मालवणकर, लुईजा गोल्सलवीस ,रंगनाथ परब,शुभेच्छा सावंत,जागृती धुरी,वंदना शितोळे , प्राजक्ता पाटील,शितल गवस ,प्रशांत पवार यांचे मार्गदर्शन लाभले. गणित विषयासंबधी प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या राज्यस्तरीय परीक्षेत बांदा केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल मुख्याध्यापक श्रीकांत आजगांवकर ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर ,उपाध्यक्षा श्रद्धा नार्वेकर , सरपंच अक्रम खान ,केंद्रप्रमुख संदीप गवस,विस्तार अधिकारी दुर्वा साळगांवकर,गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांनी अभिनंदन केले असून शाळेच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा