जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ. अर्चना मायदेव यांची अप्रतिम काव्यरचना
बांध मनाला घालुनी
कर संस्कारित मन
नको दोन पैशांसाठी
करू लाचार जीवन
नको घालू बांध बघ
शिक्षणाच्या सरितेला
गाऊ शिक्षणाचे गान
साथ देऊ सावित्रिला
बांध घालावा कृतीला
करु नये स्वैराचार
सुविचार करतसे
जीवनाची नौका पार
बांध घाल आसवांना
नको नको अश्रू ढाळू
होई सगळे चांगले
आहे माऊली दयाळू
सौ. अर्चना मायदेव
ऑस्ट्रेलिया
६/६/२०२२