कासार्डे येथे व्यायाम व आहार विषयक मोफत मार्गदर्शन शिबिर संपन्न…
तळेरे:- प्रतिनिधी
स्वतः फिट रहावे म्हणून जर देशाचे पंतप्रधान व्यायामासाठी दररोज एक तास वेळ काढत असतील तर आपण सर्व सामान्य लोक वेळ का देऊ शकत नाही?असा सवाल करीत मानवी शरीर ही निसर्गाने दिलेली अनमोल देणगी असून ते निरोगी आणि सुदृढ ठेवण्यासाठी व्यायाम ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन अहमदनगर येथील जागतिक आरोग्य सल्लागार कु.सपना सुसे यांनी कासार्डे येथे केले.
त्या कासार्डे हायस्कूल येथे आयोजित व्यायाम व आहार या विषयावर आयोजित मोफत शिबीरात प्रमुख्य वक्त्या म्हणून बोलत होत्या.
याप्रसंगी व्यासपीठावर सेवानिवृत्त पोलिस अधिकारी सुर्यकांत तळेकर, आयोजक प्रकाश पाटील,सौ.अरूणा पाटील,कु. हर्षदा आहेर(मुंबई)केशव ढाकरे,प्रताप घुगे,सिद्धार्थ शिंदे,व अन्य मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी तळेरे,कासार्डे परिसरातील उपस्थित ग्रामस्थांची मोफत बाॅडी चेक अप व आहार विषयक मार्गदर्शन करण्यात आले.
दरम्यान सुर्यकांत तळेकर यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. नियमित व्यायामाने शरीर तंदृस्त ठेवण्यात अवाजवी वाढलेले वजन कमी करण्यात मदत कशी मिळते याचे स्वअनुभवही काहींनी कथन केले. मोफत बाॅडी चेक अप आणि आ आर मार्गदर्शना लाभ पंचक्रोशीतील अनेक लोकांनी घेतला
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशव ढाकरे यांनी तर आभार कासार्डे विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड यांनी मानले.
कासार्डे:-
१)कासार्डे हायस्कूल येथे आयोजित व्यायाम व आहार शिबीरात मार्गदर्शन करताना तज्ञ मार्गदर्शिका सपना सुसे व इतर मान्यवर
२)मोफत बाॅडी चेक अप करताना सपना सुसे त्यांचे सहकारी व ग्रामस्थ