*छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष*
*डीजे, लेझीम वाद्यनात नृत्य प्रकारांचे सादरीकरण*
कणकवली :
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेजच्या वतीने कणकवली शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत भव्य दिव्य अशी मिरवणूक आज काढण्यात आली. कणकवली विजयभवन येथे या मिरवणुकीचा श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.
छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.छ. शिवाजी महाराज कि जय, जय शिवाजी जय भवानी चा जयघोष करीत डीजे,लेजीम वाद्याच्या सहाय्याने मोठ्या उत्साहात हि मिरवणूक काढण्यात आली. वाहतुकीला कोणाताही अडथळा न होता शिस्तबद्ध पद्धतीने हि मिरवणूक सपन्न झाली.
विजयभवन येथून हि मिरवणुक श्रीधर नाईक चौक येथे आल्यानंतर कै.श्रीधर नाईक यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करण्यात आला. तेथून छ. शिवाजी महाराज चौक येथे महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.तेथून पटवर्धन चौक ते बाजारपेठ मार्गे पटकीदेवी ते छ. शिवाजी नगर ते विजयभवन अशी डीजेच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणुकीत शिवाजी महाराजांच्या देखावा साकारण्यात आला होता. यावेळी प्रत्येक चौकात नृत्य प्रकार सादर करण्यात आले त्याचबरोबर लेझीम नृत्य सादरीकरण करण्यात आले. शिवगर्जना देण्यात आली.
याप्रसंगी विजयराव नाईक फार्मसी कॉलेजचे संचालक सतीश नाईक,उद्योजक संकेत नाईक, युवक कल्याण संघाचे खजिनदार प्रा. मंदार सावंत, प्रा. मेघा बाणे, प्रा. आदिती सावंत, प्राचार्य डॉ. गणुरे, उपप्राचार्या पूजा पटेल, प्रा.अमर कुलकर्णी, रोहन डोंगरे आदींसह महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी कॉलजेचे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.