सिंधुदुर्ग कन्या सामाजिक कार्यकर्ते अॅड. नकुल पार्सेकर आणि कळसुलकर हायस्कूलच्या निवृत्त शिक्षिका सौ. तृप्ती पार्सेकर यांची जेष्ठ कन्या सौ. स्नेहल पार्सेकर-मोरजकर हिने पुणे येथे दिल्ली पब्लिक स्कूलच्या शेजारी वयम् डान्सिंग स्टुडिओ सुरू केलेला असून त्याचा उदघाटन सोहळा पुणे येथे संपन्न झाला.
या डान्सिंग स्टुडिओचं वैशिष्ट्य म्हणजे एकाच छताखाली विविध डान्सिंग प्रकारचे प्रशिक्षण मिळणार आहे. यामध्ये भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकार भरतनाट्यम्, बाॅलीवुड, व्होकल, बेले डान्सचा समावेश असून उदघाटनाच्या दिवशी पुण्यातील अनेक इच्छुकांनी नोंदणीला चांगला प्रतिसाद दिलेला असून अल्पावधीतच हा स्नेहलचा पुण्यासारख्या सांस्कृतिक आणि कलेचं माहेर असलेल्या महानगरात नावं करेल असा विश्वास संचालिका स्नेहल पार्सेकर हिने व्यक्त केला.
स्नेहल हिने सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथे भरतनाट्यम परफाॅर्मीग आर्ट्स मध्ये मास्टर पदवी विशेष श्रेणीत प्राप्त केलेली असून गेल्या दहा वर्षांत तिचे महाराष्ट्र आणि गोवा येथे विविध ठिकाणी नृत्याचे कार्यक्रम झालेले असून आठ वर्षापूर्वी जपान येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सवातही तिचा सहभाग होता.
तिच्या या वयम् स्टुडिओच्या उदघाटन प्रसंगी धुळ्याचे उद्योजक श्री हिरालाल भांबरे,राष्ट्रशक्ती पुण्याचे उपाध्यक्ष शहाजी अडसूळ, मुंबईचे सामाजिक कार्यकर्ते श्री अनिल घाडी, पुण्याचे उद्योजक श्री विजय पवार, बांधकाम व्यावसायिक श्री सतिश हचाटे, वकील श्री मनोज शिंदे, पिंपरी चिंचवड येथील डॉ मिलिंद चौधरी, स्नेहलचे आईवडील तसेच कलाक्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्नेहलच्या या नवीन उपक्रमासाठी माजी केंद्रीय मंञी मा. सुरेशजी प्रभू, सावंतवाडी संस्थानच्या राणीसाहेबा सौ. शुभदादेवी भोंसले, युवराज लखमराजे, राष्ट्रशक्ती पुण्याचे संस्थापक अध्यक्ष व पुण्याचे माजी नगरसेवक श्री माऊली दारवटकर, काॅनबॅकचे संचालक श्री मोहन होडावडेकर आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या असून कलाक्षेत्रातील या कोकणकन्येचं कौतुक केल आहे.