You are currently viewing झाड

झाड

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य…. लालित्य नक्षत्रवेल सहप्रशासक लेखक कवी दीपक पटेकर यांची अप्रतिम काव्यरचना

बालपणापासून पाहत होतो
चौकातील शिरीषचे झाड
कितीतरी उंचच उंच होते
त्यापेक्षाही शेजारचे माड

वादळ वारा पावसातही
होते खंबीर उभे पाय रोवून
अढळपणा झाडाचा आम्हा
जातो जीवनसार शिकवून

ऊन पाऊस झेलत शिरीष
पादचाऱ्यांना देतो सावली
जशी मुलं मोठी झाली तरी
पदराखाली घेते मायमाऊली

चहूकडे पसरलेला असतोच
शिरीषच्या फांद्यांचा विस्तार
तप्त उन्हात हिरव्या पानांत
गुलाबी फुलांचा मुक्त संचार

चौकातल्या विशाल शिरीषची
कधीतरी गळून पडतात पाने
संकटांवर मात करत शिरीष
शिकवत असतो बहरून येणे

माहिती नसते कधी झाडांना
दुसऱ्याकडून काही मागून घेणे
वाचवलात तुम्ही एक झाड तरी
झाडंही फेडत राहते तुमचे देणे

‘झाडे लावा झाडे जगवा’ घोषणा
कागदाच्या बाहेर येऊन राबवूया
पर्यावरणाचे रक्षण करुनी आपण
शिरीषसारखे निरोगी जिणं जगुया

(दीपि)
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा