ज्येष्ठ शेतकरी नेते बाळासाहेब सावंत यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथे मोर्चा निघणार आहे. कष्टकरी शेतकऱ्यांच्या आर्थिक, मानसिक, शारीरिक भ्रष्टाचार मुक्ती करिता तसेच शेतकऱ्यांना शेती संबंधित सरकारी दाखले बांधावरच मिळावेत या मागणीकरिता या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा शेतकरी संघटना सत्यवान चव्हाण, लक्ष्मण वेंगुर्लेकर, विजय परब, दिनेश मेस्त्री, कमलाकर कदम, पंढरी परब, तसेच तमाम शेतकरी कार्यकर्ते यांचा सहभाग असणार आहे, तरी सर्व शेतकरी बांधवांनी यात मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन ज्येष्ठ शेतकरी नेते सिंधुदुर्ग बाळासाहेब सावंत यांनी केले आहे.
ज्येष्ठ शेतकरी नेते बाळासाहेब सावंत यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
- Post published:जून 5, 2022
- Post category:ओरोस / बातम्या
- Post comments:0 Comments
