भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य शरद चव्हाण यांच्या हस्ते संचालक बी. एन. सावंत यांचा सत्कार
वेंगुर्ला :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राला हवामानाचा “सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्र” पुरस्कार जाहीर झाला. कोकण कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात विद्यापीठ अंतर्गत कोकण विभागातील १६ संशोधन केंद्रांमधून शेती विषयक संशोधन आणि विस्तार कार्य करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे हे केंद्र प्रमुख ठरले आहे. तसेच या पुरस्काराचे वितरण कोकण कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या सन्मानाची दखल घेत भाजप सिंधुदुर्ग जिल्हा किसान मोर्चाच्या वतीने वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक बी. एन. सावंत यांचा सत्कार भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य शरदजी चव्हाण यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
भाजपाची किसान मोर्चा ही शेतकऱ्यांसाठी कार्यरत असलेली आघाडी आहे. या मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना, प्रशिक्षणे तसेच मार्गदर्शन केले जाते. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातात. याकामी अशाप्रकारच्या संशोधन केंद्राचे मार्गदर्शन घेऊन शेती व शेतीपूरक व्यवसायासाठी शेतकऱ्यांना मदत केली जाते. त्यामुळेच अशा संशोधन केंद्राला जर पुरस्कार मिळाला असेल तर त्यांचे कौतुक करणे क्रमप्राप्त आहे, असे मनोगत किसान मोर्चाचे जिल्हा संयोजक उमेश सावंत यांनी व्यक्त केले. या सत्कारप्रसंगी सहयोगी संचालक बी. एन. सावंत यांनी आभार व्यक्त करत शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायासाठी उद्युक्त करावे असे आवाहन किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना केले.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस व किसान मोर्चा प्रभारी प्रसन्ना देसाई, नगराध्यक्ष राजन गिरप, तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर, जिल्हा का. का. सदस्य साईप्रसाद नाईक, ता. सरचिटणीस बाबली वायंगणकर, ता. उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस व प्रीतेश राऊळ, नगरसेवक प्रशांत आपटे, किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस गुरुनाथ पाटील व बाळू प्रभु, किसान मोर्चा जिल्हा महिला संयोजक दिपा काळे, किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ केळुसकर, किसान मोर्चा जिल्हा चिटणीस अजय सावंत, किसान मोर्चा मालवण मंडल अध्यक्ष महेश श्रीकृष्ण सारंग, किसान मोर्चा ओरस मंडल अध्यक्ष सूर्यकांत नाईक, प्रगतशील शेतकरी प्रकाश झेंडे, शेतकरी मित्र महादेव नाईक, प्रगतशील शेतकरी व तुळस सो.सा.चेअरमन संतोष शेटकर , ता.का.का.सदस्य रविंद्र शिरसाठ, बुथप्रमुख शेखर काणेकर, किसान मोर्चा वेंगुर्ले ता. सरचिटणीस सत्यवान पालव, शैलेश जामदार, सौरभ नाईक, हेमंत आडारकर इत्यादी भाजपा पदाधिकारी व किसान मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.