कणकवली
कणकवली:शहरात अनधिकृतपणे लागणारे बॅनर व यामुळे शहरात निर्माण होणारे तणावपूर्ण वातावरण तसेच शहराचे होणारे विद्रुपीकरण यामुळे कणकवली नगरपंचायत ने अनधिकृत बॅनर वर कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. कणकवली शहरात नेत्यांचे वाढदिवस, राजकीय मेळावे तसेच इतर कार्यक्रमांसाठी ठिकठिकाणी विनापरवाना बॅनर लावले जातात. सध्या एकमेकांची उणीदुणी काढण्यासाठी बॅनरबाजी हाेत आहे.
या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीने कडक पावले उचलली आहेत. विनापरवाना बॅनर लावताना कुणी आढळल्यास त्याच्यावर नगरपंचायत प्रशासनाच्यावतीने कारवाई केली जाणार आहे.
तसेच शहरातील नागरिकांना अनधिकृत बॅनर, होर्डिंग, फ्लेक्स, जाहिराती यांबाबत तक्रार करावयाची असेल तर नागरिकांनी १८००२७२२३२० या क्रमाकांवर संपर्क साधून आपली तक्रार करावी असे आवाहन कणकवली मुख्याधिकाऱ्यांनी केली आहे. नुकतेच कणकवली शहरातील बॅनरबाजी वरून राजकारण तापलेले असता हा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याने आता अनधिकृत बॅनरबाजीला चाप लागणार आहे.