सावंतवाडी :
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळाशी संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ यांच्यावतीने दरवर्षी इ.०५ वी व ८ वी साठी गणित प्राविण्य परीक्षा आयोजित केली जाते. तसेच यातील यशस्वी विद्यार्थ्यांना अंतिम टप्प्यात म्हणजे प्रज्ञा परीक्षेसाठी संधी मिळते.
यावर्षी राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी गणित संबोध परीक्षेप्रमाणेच गणित प्राविण्य परीक्षेमध्ये आणि आता प्रज्ञा परीक्षेत यश संपादन केले आहे. इ.०५ वीतून कु. तन्वी प्रसाद दळवी व इ.०९ वीतून कु. पारस प्रसाद दळवी या दोघाना प्रमाणपत्र पात्र विद्यार्थी म्हणून सन्मान मिळाला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व सर्व गणित शिक्षकांचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष विकास सावंत, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक शाळा समिती अध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सर्व संस्था सदस्य तसेच मुख्याध्यापक जे.व्ही. धोंड , उपमुख्याध्यापक एस. पी. नाईक, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.