जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी प्रा.नंदू वानखडे यांची अप्रतिम काव्यरचना
आपणचआपल्या, पाण्यामध्ये विष घोळले
आयुष्याच्या जखमेवरती, मीठ चोळले..
गरज नसता, पिकावरी त्या फवारणीची..
उगीच त्यांच्या पानावरती, जहर सोडले…
अधिक यावे उत्पादन, या हव्यासापोटी
मातीमध्ये भरमसाठ,ते खत पेरले..
मिळे कुठे ना , पिण्यास पाणी अवतीभोवती
शिशी मध्ये घेऊन त्यासी, आत कोंडले..
दुकानदारी सुरूच आहे पाण्यासाठी
पिता पिता खर्चापायी ओठ पोळले…!
अन्नसुरक्षा मोहीम केवळ, कागदावरती
महत्त्व त्याचे काळजावरती नाही कोरले..
फळे कुठली नुसते, विकती जहर सारे
फक्त नफ्याचे हिशोब केवळ इथे चालले….
— प्रा. नंदू वानखडे
मुंगळा जि. वाशिम-9423650468