You are currently viewing दोडामार्गातील हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी संयुक्त बैठक घ्या – विनायक राऊत

दोडामार्गातील हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी संयुक्त बैठक घ्या – विनायक राऊत

मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी…

दोडामार्ग

तालुक्यात केर, मोर्ले,हेवाळे आदी भागात रानटी हत्तींचा उपद्रव वाढत आहे. त्यामुळे योग्य तो तोडगा काढण्यासाठी तातडीची बैठक घेवून निर्णय घ्यावा,अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. शेती नुकसानी बरोबर ग्रामस्थांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी लोकप्रतिनिधी आणि वनमंत्री यांची संयुक्त बैठक घेऊन योग्य तो निर्णय घ्या, अशी त्यांनी मागणी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा