अहिल्यादेवी सेवाभावी संस्था – प्रकाश आवाडे क्रीडा अकादमीच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
इचलकरंजी येथे अहिल्यादेवी सेवाभावी संस्था व प्रकाश आवाडे क्रीडा अकादमीच्या संयुक्त विद्यमाने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त फ्री स्टाईल मुलींचे फ्री स्टाईल भव्य निकाली कुस्ती मैदान दि.९जून रोजी व्यंकोबा मैदानमध्ये आयोजित केल्याची माहिती संयोजक चंदूर ग्रामपंचायत सदस्या
सौ.ललिता पुजारी व इचलकरंजी धनगर समाजाचे उपाध्यक्ष राजू पुजारी यांनी पञकार बैठकीत बोलताना दिली.यावेळी उपमहाराष्ट्र केसरी पै.अमृत भोसले प्रमुख उपस्थित होते.
कुस्ती क्षेत्रात मुलींना अधिक प्राधान्य मिळून त्यांचे चांगले करिअर घडावे ,याच उद्देशाने अजूनही म्हणावे तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत.त्यामुळे कुस्ती क्षेञात मुलींना चांगल्या पद्धतीने प्रोत्साहन मिळून कुस्ती कलेचा अधिक व्यापक प्रमाणात प्रचार आणि प्रसार होतानाच ती टिकून राहण्यासाठी अहिल्यादेवी सेवाभावी संस्था व प्रकाश आवाडे क्रीडा अकादमी या दोन्ही दोन्ही संस्थांनी पुढाकार घेतला आहे.या दोन्ही संस्थांच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मुलींचे फ्री स्टाईल भव्य निकाली कुस्ती मैदान दि.९जून रोजी व्यंकोबा मैदानमध्ये आयोजित करण्यात आले आहे.या मैदानाचे उद्घाटन माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे व शामराव फडके यांच्या हस्ते व आमदार प्रकाश आवाडे ,माजी नगराध्यक्ष अशोक आरगे , आयडीयल इन्स्टिट्यूटचे चेअरमन कल्लाप्पाण्णा गावडे ,माजी नगरसेवक सागर चाळके , रविंद्र माने , यशवंत सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश तांबे , धनगर समाजोन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष अशोक कोळेकर यांच्यासह विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.यामध्ये सुमारे ३६ मुलींच्या कुस्त्या खेळवल्या जाणार आहेत.तसेच विजेत्या मल्लांना चषक व आकर्षक बक्षिसे देवून गौरवण्यात येणार असल्याची माहिती संयोजक चंदूर ग्रामपंचायत सदस्या सौ.ललिता पुजारी व इचलकरंजी धनगर समाजाचे उपाध्यक्ष राजू पुजारी यांनी पञकार बैठकीत बोलताना दिली.तसेच या कुस्ती मैदानाचा महिला वर्गाने लाभ घ्यावा ,असे आवाहन देखील त्यांनी केले.
यावेळी उपमहाराष्ट्र केसरी पै.अमृत भोसले ,माजी नगरसेवक रविंद्र लोहार ,पै.बापू ऐकले,बाळू शिंदे , दिलीप माने आदी उपस्थित होते.