हिंदुजनजागृती समितीची मागणी : सावंतवाडी तहसीलदार यांना निवेदन
सावंतवाडी
देशभरातील ‘कॉन्व्हेंट शाळां’मध्ये हिंदु विद्यार्थ्यांना बायबल शिकण्याची सक्ती करण्यावर प्रतिबंध आणणे, तसेच भारतीय राज्यघटनेतील कलम २९ आणि ३० यांमध्ये सुधारणा करणे, यांविषयी हिंदुजनजागृती समितीच्या वतीने मा. शिक्षणमंत्री भारत सरकार नवी दहेली यांना देण्यासाठीचे निवेदन सावंतवाडी तहसीलदार यांना देण्यात आले.
या निवेदनांत म्हटले कि, कर्नाटकातील ‘क्लेरेन्स हायस्कूल’ या कॉन्व्हेंट शाळेत मुलांना बायबल शिकणे बंधनकारक असल्याचे निदर्शनास आल्यानंतर देशात पुन्हा एकदा ‘कॉन्व्हेंट शाळां’मध्ये काय चालते, याची चर्चा चालू झाली.
भारतात व्यापारासाठी आलेल्या ‘ईस्ट इंडिया कंपनी’च्या काळापासून ते आतापर्यंत ख्रिस्ती मिशनर्यांनी स्थापन केलेल्या कॉन्व्हेंट शाळांचे एकच लक्ष्य दिसून येते, ते म्हणजे विद्यार्थ्यांचे धर्मांतरण करणे ! आज घडीला देशात प्रतीवर्षी १० लक्ष हिंदूंचे धर्मांतर होते, ही खेदाची गोष्ट आहे. कॉन्व्हेंट शाळा या धर्मांतराचे बीज विद्यार्थ्यांच्या बालमनावर लहानपणीच रोवण्याचा प्रयत्न करतात. शाळेतून आरंभलेले हे मानसिक आणि बौद्धीक स्तरावरील धर्मांतराचा अंत पुढे जाऊन धार्मिक दृष्टीने संपूर्ण कुटुंब धर्मांतरीत होण्यात होतो.
यातूनच पुढे काही नगरे, तालुके, जिल्हे आणि राज्ये ख्रिस्ती बहुसंख्य होत आहेत. याचे उदाहरणच पहायचे झाले तर, भारत स्वतंत्र झाला, तेव्हा हिंदु बहुल असणार्या ईशान्य भारतातील सात राज्यांपैकी नागालँडमध्ये ८८ टक्के ख्रिस्ती, मिझोराममध्ये ८७ टक्के ख्रिस्ती, मेघालयमध्ये ७५ टक्के ख्रिस्ती, मणिपूरमध्ये ४२ टक्के ख्रिस्ती, अरूणाचल प्रदेशमध्येही ख्रिस्तीच बहुसंख्यांक आहेत. या ७ पैकी ५ राज्ये आणि अंदमान-निकोबार या बेटांपैकी निकोबार बेट (७० टक्के ख्रिस्ती) ख्रिस्ती धर्मीय बहुसंख्यांक झाले आहे. ही आकडेवारी वर्ष २०११ ची आहे. गेल्या ११ वर्षांत यामध्ये कदाचित अजून एखाद्या राज्याची भर पडली असू शकते. ‘कॉन्व्हेंट शाळा’ या गंभीर विषयातील एक महत्त्वाचा भाग आहेत. हे दुर्लक्षून चालणार नाही.त्यामुळे आमच्या विनंतीचा विचार करावा असे या निवेदनात नमूद केले आहे.