You are currently viewing फोंडाघाट बाजारपेठेत तृतीयपंथी घोळक्याचा हैदोस

फोंडाघाट बाजारपेठेत तृतीयपंथी घोळक्याचा हैदोस

पथदीप/सी.सी. कॅमेरे बंद/ चोरी च्या पार्श्वभूमीवर व्यापारी नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण

ग्रामपंचायत/पोलिस यंत्रणा कळवूनही सुशेगात ?

फोंडाघाट

स्कार्फ लावून चेहरा झाकलेल्या चार-पाच तृतीयपंथी घोळक्याने फोंडाघाट बाजारपेठेत, शनिवारी सकाळी ,प्रत्येक दुकानापुढे जाऊन मोठ- मोठ्या आवाजात, पैशाची मागणी करत, हैदोस घातला. यात लहान-मोठ्या व्यापाऱ्यांची कुचंबणा झाली. मोठ्याने टाळ्या वाजवत, मनासारखे पैसे न मिळाल्यास व्यापाऱ्यांशी हुज्जत घातली. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. काही सजग ग्रामस्थांनी सरपंच, पोलीस कॉन्स्टेबल यांच्याशी संपर्क साधून तातडीने येऊन परिस्थिती हाताळण्याची विनंती केली. मात्र नेहमीप्रमाणे त्यांनी न येता बोळवण केली. एका दुकानात अरेरावी करताना कपडे सुद्धा वर करण्याचा प्रयत्न त्या किन्नरांनी केला .आवाज वाढताच आजूबाजूचे व्यापारी- ग्रामस्थ धावले. त्यांनी किन्नरांकडे आधार कार्ड मागितले. त्या किन्नरांनी आपली चपलाशी या बाजारात चालणार नाही ? याची खात्री पटल्याने, रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षातून कणकवली- नांदगाव कडे पोबारा केला.

सध्या रात्री प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे पथदीप बंद असल्याने रस्त्यावर अंधार असतो. त्यातही पेठेतील सी. सी. कॅमेरे, लाईट बिल न भरल्याने बंद आहेत .महिन्याभरापूर्वी टेहळणी करून गावांमध्ये आठ ते दहा घरे- दुकाने फोडून लाखाचा ऐवज लुटून नेला होता. अशा दहशतीच्या वातावरणात ग्रामस्थ- व्यापारी असताना अशा अनोळखी व्यक्तींचा- टोळक्याचा वावर संशयाला वाव देणारा आहे. गेल्या महिन्या पासून पैसे मागण्यास येणाऱ्या वेगवेगळ्या अनोळखी किन्नरांचा वावर ही पेठेमध्ये वाढला आहे. मात्र सुरक्षा सु व्यवस्थेकडे ग्रामपंचायतीचे लक्ष आहे, ना पोलीस यंत्रणेचे ? कळवूनही येण्याचे सौजन्य दाखवले जात नाही. याबद्दल ग्रामस्थ- व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.याबाबत तातडीने बंदोबस्त करावा तसेच ग्रामस्थांनी- व्यापाऱ्यांनी दक्षता पाळून तातडीने पोलिस अथवा सरपंचाकडे संपर्क साधावा असे आवाहन सतर्क ग्रामस्थांतर्फे करण्यात येत आहे…

प्रतिक्रिया व्यक्त करा