वैभववाडी :
व्हिजन मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल कोल्हापूर व अर्जुन रावराणे विद्यालय,कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय आणि जयेंद्र रावराणे इंग्लिश-सेमी-इंग्लिश स्कूल वैभववाडी यांच्या विद्यमाने ५ जून रोजी महाआरोग्य शिबिर होत आहे. येथील अ. रा.विद्यालयात सकाळी १० ते दु. ३ या वेळेत रुग्णांची मोफत तपासणी केली जाणार आहे. जि. प. माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांनी या शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिरात पोट विकार व शस्त्रक्रिया, आतड्यांचे विकार, एन्डोस्कोपी, नेत्रतपासणी ,मूळव्याध ,मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब ,श्वसनविकार ,किडनी, अस्थिरोग, स्त्रीरोग ,आदी आजारांची तपासणी केली जाणार आहे. तालुक्यातील जनतेने याचा लाभ घ्यावा ,असे आवाहन संताजी ऊर्फ बाबा घोरपडे व जयेंद्र रावराणे यांनी केले आहे.