सावंतवाडी
माजगांव नाला हे ठिकाण सध्या पंचक्रोशीत केंद्र बिंदू होत आहे. तसेच माजगांव परिसरातील लोकवस्ती झपाट्याने वाढत आहे. सध्या माजगांव नाल्यावर पंचक्रोशीतील लोकांची नियमित मोठ्या प्रमाणावर रेलचेल आहे. दोन बँक, पतसंस्था, दोन डॉक्टर दवाखाने विविध प्रकारची सर्व दुकाने, मासे, भाजीपाला, उद्यमनगर व इतर औद्योगिक वसाहती आहेत. त्यामुळे बन्यापैकी आर्थिक रोजगार निर्मिती होत आहे.
तरी आठवडाबाजार भरल्यास ग्रामपंचायतचे कर रूपाने आर्थिक उत्पन्न वाढेल. तसेच गावातील दुध, भाजीपाला व घरगुती इतर उत्पादनांची विक्री होऊन रोजगार निर्मिती होईल. माजगांव गावाला लागून चराठे, ओटवणे, कारीवडे, इन्सुली ह्या गावातील लोकांना एक कमी अंतराची बाजारपेठ उपलब्ध होईल.
याचा विचार करून ग्रामपंचायत स्तरावरून आठवडा बाजार भरून लोकांना सोई सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी माजी उपसभापती चंद्रकांत कासार यांनी निवेदनामार्फत माजगाव सरपंच दिनेश सावंत यांच्याकडे करण्यात आली.