You are currently viewing वैभववाडीत विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी पावसाची हजेरी

वैभववाडीत विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी पावसाची हजेरी

वैभववाडी :

 

वैभववाडीत गुरुवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी पावसाने झोडपून काढले. पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून उष्णतेने हैरान झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. वादळी पावसाने करुळचे नाक्याजवळ रस्त्यावर झाड पडल्यामुळे गगनबावडा वैभववाडी मार्गावरील वाहतूक सुमारे तासभर ठप्प झाली होती. पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने रस्त्यावर पडलेले झाड हटवून वाहतूक सुरळीत केली. गेली दोन दिवस सर्वत्र ढगाळ वातावरण होते. सायंकाळी ६.३० वा. सुमारास तालुक्यात जोरदार वादळी पाऊस सुरू झाला. त्यातच विजांचा कडकडाट सुरू होता. मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. तर लवकरच मान्सूनचे आगमन होईल अशी अपेक्षा व्यक्त करीत आहे. शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला लागला आहे. या पावसामुळे पेरणी योग्य वातावरण झाले आहे. त्यामुळे लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + twelve =