देवगड
तालुक्यातील विठ्ठलादेवी ग्रामपंचायतीने गावात विधवा प्रथा बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरपंच दिनेश नारकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मासिक सभेत हा ठराव घेण्यात आला. दरम्यान त्याला सर्वांनी अनुमोदन दिले. यावेळी उपसरपंच विजय नारकर, ग्रामसेवक विवेक नर, तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षात त्यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जोपासत ग्रामपंचायत हेरवाड (ता. शिरोळ जि. कोल्हापूर) यांनी अनिष्ट विधवा प्रथेचे निर्मूलन होण्यासाठी केलेली कृती स्तुत्य आहे. त्या शासनानेदेखील १७ मे रोजी शासन परिपत्रक जारी केले आहे. अनुषंगाने विठलादेवी सरपंच दिनेश नारकर व उपसरपंच विजय नारकर ग्रामसेवक विवेक नर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या सभेत अनिष्ट विधवा प्रथा बंद करण्याचा एकमुखी ठराव घेण्यात आला. प्रथांचे निर्मूलन होणार ! शासन निर्णयामुळे ग्रामसभेत झालेल्या निर्णयानंतर विठ्ठलादेवी गावामध्ये पतीच्या निधनावेळी पत्नीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढली जाणे, यांसारख्या प्रथांचे निर्मूलन करण्यात येणार आहे. यामुळे विधवांची अवहेलना थांबेल ही प्रथा समूळ नष्ट करण्यासाठी वयोवृद्ध आणि ज्येष्ठ ग्रामस्थांची मदत घेऊन गावातील तरुण आणि महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या सहकायनि उद्बोधन आणि जनजागृती करण्यात येईल. त्यामुळे यानंतर पतीच्या निधनानंतर विधवा महिलांना देखील इतर महिलांप्रमाणेच समाजामध्ये सन्मानाने जगण्याचा संविधानिक अधिकार अबाधित राहील आणि विधवा म्हणून समाजात वावरत असताना होणारी अवहेलना होणार नाही. आणि त्यांना इतर सर्वसामान्य महिलांप्रमाणे जीवन जगता येईल. विधवा प्रथा बंद होण्यासाठी विशेष करून सरपंच उपसरपंच याचबरोबर ग्रामसेवक विवेक नर यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.