You are currently viewing माझगाव डॉक सेवेतून अविनाश कुबल निवृत्त

माझगाव डॉक सेवेतून अविनाश कुबल निवृत्त

मुंबई

माझगाव शिपबिल्डर्स लिमिटेड गुणवत्ता आश्वासन विभागातील कर्तव्यदक्ष एस ग्रेड गुणवत्ता निरीक्षक अविनाश प्रेमानंद कुबल ३१ मी रोजी आपल्या ४१ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना उप महाप्रबंधक अंजनी कुमार यांनी सांगितलं कि, आपल्याला निवृत्ती वेतनाचा लाभ मिळत नाही हे सर्वश्रुत असून जी काही रक्कम आपणास लाभली त्याचा योग्य विनियोग करून आयुष्य सुखकर करण्यासाठी प्रयत्न करा असे नमूद केले.
यावेळी मुख्य प्रबंधक रंजन नाथ भौमिक, वरिष्ठ निरीक्षक बाळा परब, अपूर्वा कुबल, माजी तहसीलदार प्राची कांदळगावकर, केशव कुबल आदी प्रभृती उपस्थित होत्या.
यावेळी अविनाश कुबल यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन अंजनी कुमार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
अंजनी कुमार पुढे म्हणाले कि, अविनाश कुबल यांच्या विषयी आपण सर्वानी मनोगत व्यक्त केले. त्यातून त्यांचो थोरवी दिसून आली. मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो.
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मधील विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी कुबल याना भेटवस्तू प्रदान करून शुभेच्छा दिल्या. कर्मचाऱ्यांच्या वतीने विलास चव्हाण, विजय राणे, रविराज कांबळी, चिन्मय कुबल, मोरेश्वर कर्वे यांनी कुबल यांच्या विषयीच्या आठवणींना उजाळा दिला.
आपल्या सत्कारादाखल बोलताना अविनाश कुबल यांनी माझगाव डॉक मधील प्रारंभीचा प्रवास खडतर होता. मात्र त्यानंतर तो सुखकर झाला. त्यामुळे आजचा दिवस पाहू शकलो. त्याबद्दल सर्व सहकार्यांना मनापासून धन्यवाद देतो असे सांगितले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऋषाली कवडे, मनीषा पाटील, सायली वारकर , अनिकेत कोयंडे आदींनी परिश्रम घेतले. तर या रंगतदार सोहळ्याचे सूत्रसंचालन उल्हास निखाले यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा