कुडाळ :
तालुक्यातील जि. प. व पं. स. प्रभागांची प्रारूप रचना नव्याने जाहीर झाल्याने या तालुक्यात जिल्हा परिषदेचे १० तर पंचायत समितीचे २० मतदार संघ झाले आहेत. अंतिम प्रभाग रचना दि. २७ जून रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार अमोल फाठक यांनी दिली.
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जवळ येऊ लागल्या असून सदर च्या निवडणुकीची पूर्वतयारी प्रशासनाने सुरू केली आहे या पार्श्वभूमीवरच या ठिकाणी प्रभाग रचना बदलणार जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जवळ येऊ लागल्या असून सदर च्या निवडणुकीची पूर्वतयारी प्रशासनाने सुरू केली आहे या पार्श्वभूमीवरच या ठिकाणी प्रभाग रचना बदलणार का अशी जोरदार चर्चा गेले काही दिवस राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात केली जात होती. दरम्यान सदरच्या या तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीची प्रभाग रचना बदलण्यात आली असून प्रभाग जिल्हा परिषदेचा एक मतदार संघ वाढल्याने १० झाले आहेत. तर पंचायत समितीचे दोन प्रभाग वाढल्याने २० झाले आहेत.
जिल्हा परिषद मतदारसंघ
नव्याने जाहीर झालेले नव्याने जाहीर झालेले जिल्हा परिषद मतदारसंघ नव्याने जाहीर झालेले जिल्हा परिषद मतदारसंघ आंब्रड, कडावल, कसाल, ओरोस बुद्रुक, नेरुर तर्फ हवेली, तेंडोली, झाराप, तुळसुली तर्फ माणगाव, नेरुर कर्यात नारुर व माणगाव असे दहा जिल्हा परिषद मतदार संघ जाहीर करण्यात आले आहेत.
पंचायत समिती मतदारसंघ
पंचायत समितीचे मतदार संघ आंब्रड, घोडगे, कडावल, डिगस, कसला, अणाव, ओरोस बुद्रुक, बांबर्डे तर्फ कळसुली, नेरुर तर्फ हवेली, मानकादेवी, तेंडोली, पाट, झाराप, गुढीपूर, तुळसुली तर्फ माणगाव, खुटवळवाडी, नेरुर कर्यात, नारुर, गोठोस, माणगाव व आकेरी असे वीस पंचायत समिती मतदार संघ करण्यात आले आहेत.
सदरची प्रभाग रचना प्रारूप असुन या बाबत दि. २ ते ८ या कालावधी पर्यंत हरकती मागविण्यात येणार असुन त्यानंतर प्राप्त झालेल्या हरकती व सूचना यावर सुनावणी देऊन निवडणूक विभाग निर्वाचक गण रचना दि. २२ जून रोजी पर्यंत अंतिम करणार व अंतिम प्रभाग रचना दि. २७ जून रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार अमोल फाठक यांनी दिली.