You are currently viewing ओरोस येथे ५ जूनला १६ वर्षाखालील मुला-मुलींसाठी जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा…

ओरोस येथे ५ जूनला १६ वर्षाखालील मुला-मुलींसाठी जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा…

ओरोस

सिंधुदुर्ग जिल्हा चेस सर्कल यांच्या मान्यतेने श्री चेस अकादमी कणकवली आणि सुयोग चेस अकादमी सुकळवाड यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय जिल्हास्तरीय १६ वर्षाखालील मुला मुलींसाठी बुद्धिबळ स्पर्धा २०२२ रविवार दि ५ जून रोजी ओरोस फाटा येथील श्री इच्छा गोविंद मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक स्पर्धकांनी ९४२२३८१९४९, ९४२०२६०७४४, ९४०४३९६२१६ या नंबरवर ४ जून पर्यंत एसएमएस करून नाव नोंदणी करावी, असे आवाहन आयोजक यांच्यावतीने करण्यात आले आहे. स्पर्धेतील प्रथम विजेत्यास एक हजार रुपये, द्वितीय ७५० रुपये, तृतीय ५०० रुपये व तिन्ही स्पर्धकांना चषक तसेच क्रमांक चार ते दहा असे विजेते काढले जाणार असून बक्षिसे व मेडल देण्यात येणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा