You are currently viewing बौद्धकालीन प्राचीन अवशेष वाचविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन…

बौद्धकालीन प्राचीन अवशेष वाचविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन…

सिंधुदुर्गनगरी :

बौद्धकालीन अवशेष वाचवण्यात यावेत त्यांचे संवर्धन करण्यात यावे तसेच ही सर्व विरासत बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क हस्तांतरित करण्यात यावे या मागणी साठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क संघटनेच्या वतीने जिल्हा प्रभारी व्ही. बी. जाधव यांच्या नेतृत्वाखाली
एक दिवसीय धरणे आंदोलन छेडण्यात आले आहे यावेळी सगुन जाधव, लाडू जाधव, भीमराव कांबळे, शिल्पा इंगळे आदी उपस्थित होते.

बुद्धिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क हे गैर राजनैतिक धार्मिक संघटन नेटवर्क असून ते बौद्ध लेण्या व स्तूप यांचे संवर्धन व संशोधन करण्याचे काम करत आहे.बुलढाणा जिल्ह्यातील भोन, उस्मानाबाद येथील तगर अथवा तेर, नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील अडम स्तूप, भंडारा जिल्ह्यातील पवनी बुद्ध स्तूप, पुणे येथील जुन्नर लेणी, देहूरोड येथील बुद्ध विहार, अकोला जिल्ह्यातील पातूर लेणी, नाशिक येथील त्रीरष्मी लेणी, कारले येथील बुद्ध लेणी, नालासोपारा येथील बुद्ध स्तूप व लेणी नष्ट होत आहेत याकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष आहे ज्यामुळे ही प्राचीन विरासत षड्यंत्र पूर्वक नष्ट केल्या जात असल्याचा आरोप यावेळी बुद्धिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क चे प्रभारी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. जाधव यांनी केला आहे.

या सर्व लेण्यांचे संवर्धन करण्यात यावे व ही सर्व विरासत बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क संघटनेकडे हस्तांतरित करण्यात हवी अशी मागणी यावेळी आंदोलन करते जाधव यांनी केली आहे.
यावेळी जाधव यांनी सांगितले की 12 ऑक्टोबर ला महाराष्ट्रातील 366 तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले जाणार आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्व विभागीय पुरातत्वीय कार्यालयावर 30 ऑक्टोबर ला धडक मोर्चा नेण्यात येणार असल्याचे संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा