शाळांची दुरुस्ती न झाल्यास 6 जून पासून बेमुदत उपोषणाचा इशारा
कणकवली
कणकवली तालुका काँग्रेसच्या वतीने कणकवली तालुक्यातील काही प्राथमिक शाळा चे छप्पर नादुरुस्त झाले आहे. येत्या १३ तारखेपासून शाळा सुरू होणार आहे. तरी अजूनही छप्पर दुरुस्ती केलेली नाही एक तर जिल्हा परिषद शाळेमध्ये गरीब मुले शिकतात .आधीच पटसंख्या कमी म्हणून ओरड मारली जाते. प्रशासनाचा या शाळा बंद करण्याचा घाट आहे काय ? अशी शंका वाटते म्हणून म्हणून तालुका कणकवली तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने कणकवली पंचायत समिती गेले तीन दिवस ठिय्या आंदोलन चालू आहे .आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे जर येत्या पाच तारखेपर्यंत शाळांची दुरुस्ती झाली नाही तर दिनांक 6 जून पासून बेमुदत उपोषणाचा इशारा तालुका अध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी दिला आहे. कणकवली पंचायत समितीचे पदाधिकारी फक्त ज्या कामात पैसा मिळतो तेवढीच कामे घेतात ,परंतु शिक्षणासाठी लक्ष दिले जात नाही. तालुक्यातील लोकांनाही आवाहन आहे की आता भाकरी परतण्याची वेळ आलेली आहे पंचायत समितीवर वर्षानुवर्ष तेच अधिकारी असल्याने महत्त्वाची कामे होत नाहीत. तरी या आंदोलनामध्ये कणकवली शहर अध्यक्ष महेश तेली जिल्हा सरचिटणीस महेंद्र सावंत जिल्हा सांस्कृतिक विभाग अध्यक्ष प्रवीण वरूनकर कणकवली तालुका उपाध्यक्ष निलेश मालडंकर ,प्रदीप कुमार जाधव व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.