जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य राष्ट्रीय प्रतिभा पुरस्कारीत ज्येष्ठ लेखक कवी प्रो. डॉ.जी. आर. उर्फ प्रवीण जोशी यांच्या रेशीम कोष काव्यसंग्रहातील अप्रतिम काव्यरचना
सुर्य येथे कधी न दिसला
चंद्र चांदणे कधी न हसले
वसंत इथे कधी न फुलला
आयुष्याच्या ह्या अंधारात
खितपत पडती अनेक आकृत्या
धुरकटलेल्या झोपडी वस्त्या
कळकटलेले विद्रुप रस्ते
सर्व काही ईश्वर निर्मित
मानवतेनी तुच्छ लेखिले
एक महात्मा थोर लाभला
आधार दिला अंधार यात्रींना
शतकीरणाने ज्ञान उजळीत
शतजन्माची हार पराजित
बौद्धांचा उपदेश देऊनी
सुर्य दाविला इथे उगवुनी
प्रो डॉ जी आर प्रवीण जोशी
अंकली बेळगाव
कॉपी राईट