जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ.अर्चना मायदेव यांची अप्रतिम लावणी रचना
जोडवी नाजूक नाजूक घडवा
राया मला सोळा शृंगाराने मढवा ||ध्रु||
कोल्हापुरी साज मज आहे प्रीतीचा
केसांमध्ये माळा हा गजरा सुरंगीचा
शुभ मुहूर्त आहे आज हो पाडवा
राया मला सोळा शृंगाराने मढवा. १
नार नवतीची मी जशी चवळीची शेंग
पहावया मजला लागली दुहेरी रांग
काळजावरी माझ्या नाव तुमचे गोंदवा
राया मला सोळा शृंगाराने मढवा…२
जोडवी शोभती नाजूक बोटां भवती
नथ शोभून दिसते ओठ पाकळ्यांवरती
मिलनाचा मुहूर्त राया तुम्हीच लवकर ठरवा
राया मला सोळा शृंगाराने मढवा. ३
सौ. अर्चना मायदेव
पुणे