पहिल्याच दिवशी शंभर मुलांची नोंदणी…
अमरावती
काल केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या आयएएस या परीक्षेचा निकाल लागला आहे. या निकालाचे निमित्त साधून डॉ.पंजाबराव देशमुख आय ए एस अकादमीच्या मिशन आयएएस ने आपल्या दुसऱ्या वर्गापासून कलेक्टर होण्याचे प्रशिक्षण या उपक्रमाचा शुभारंभ केला आहे.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना प्रतिदिन एक रुपया शुल्क आकारण्यात येते. त्यामध्ये त्यांना त्यांच्या वर्गाची स्पर्धा परीक्षांची पुस्तके विनामूल्य वितरित करण्यात येतात. तसेच त्यांना वर्षभर वेळोवेळी उच्चपदस्थ अधिकारी मार्गदर्शन करावयास येतात.
हा उपक्रम गेल्या दहा वर्षापासून महाराष्ट्रात सुरू असून या उपक्रमामध्ये हजारो विद्यार्थी सहभागी झालेले आहे . या उपक्रमात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी मिशन आयएएसचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांच्याशी 98 90 96 7003 या क्रमांकावर संपर्क साधावा. या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना विनामूल्य पुस्तके देणे .त्यांची परीक्षा घेणे. त्यांचे पेपर तपासणे. त्यांना गुणपत्रिका देणे व प्रमाणपत्र देणे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून मेरीट लिस्ट मध्ये आलेल्या मुलांना सन्मानपत्र व पारितोषिके देणे याचा समावेश आहे .काल या उपक्रमाचा शुभारंभ करताच जालना जिल्ह्यातून परतूर या गावातून विवेकानंद विद्यालयातून शंभर मुलांची नोंदणी करण्यात आली .डॉ.पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी ही महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध स्पर्धा परीक्षा अकादमी असून या अकादमीमध्ये आतापर्यंत 350 सनदी व राजपत्रित अधिकारी मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत .संस्थेचे उद्घाटन बावीस वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री उद्धव ठाकरे साहेब यांचे प्रधान सचिव श्री विकास खारगे आय ए एस यांनी केले आहे .गेल्या बावीस वर्षांत संस्थेने महाराष्ट्रात ठिक ठिकाणी आपल्या शाखा उघडल्या असून या शाखांमध्ये मुलांसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी ग्रंथालय व अभ्यासिका नाममात्र दरात उपलब्ध करून देण्यात येते .याशिवाय जी मुले प्रत्यक्ष आय.ए.एस. ची परीक्षा देतात त्यांना दिल्लीच्या मालुका आयएएस अकादमीतर्फे ऑनलाईन विनामूल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येते. अशाप्रकारे विनामूल्य सेवा देणारी डॉ.पंजाबराव देशमुख ही भारतातील एकमेव अकादमी आहे .विशेष म्हणजे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी अंशकालीन काम तसेच त्यांची भोजन व निवास व्यवस्था करण्यासाठी देखील आकादमी कार्यरत आहे. डॉ.पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीतर्फे मी आयएएस अधिकारी होणारच .शेतकऱ्याची मुले झाली कलेक्टर .आयएएस अधिकाऱ्यांच्या यशोगाथा. आयपीएस अधिकाऱ्यांच्या यशोगाथा .स्पर्धा परीक्षेची ए बी सी डी .आनंदी राहा यशस्वी व्हा .प्रेरणा स्पर्धा परीक्षेची .अशी विविध पुस्तके प्रकाशित झाली असून की ही सर्व पुस्तके विद्यार्थ्यांना 75 टक्के सवलतीने उपलब्ध करून देण्यात येतात.
==============
प्रकाशनार्थ
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस अमरावती.