You are currently viewing ध्वनि संदेशाद्वारे वादळापासून मासेमारांच्या जीवाचे रक्षण

ध्वनि संदेशाद्वारे वादळापासून मासेमारांच्या जीवाचे रक्षण

“रिलायन्स फाउंडेशनची सागरी हवामानाची माहिती ही माझ्या सारख्या  लहान मासेमारांसाठी एक वरदान आहे” असे निरीक्षण खुद्द संतोष डोर्लेकर यांनी निंदिवले आहे.

बाहेरून शांत भासणारा समुद्र कधी कधी अत्यंत रौद्र रूप धारण करतो.उदरनिर्वाहाच साधन म्हणून मासेमारी करणारे मासेमार बांधव सागरी सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असतात . लहान बोट व कमी मनुष्यबळ आणि बोट जास्त काळ समुद्रात राहील अशी यंत्रणा नसल्याने हे मासेमार सर्रास सागरी अपघातांना बळी पडतात.

गावडेआंबेरे रत्नागिरी येथे राहणारे 45    वर्षीय संतोष मोहन डोर्लेकर यांचे कुटुंब उदरनिर्वाहासाठी मासेमारी हा व्यवसाय पिढ्यानपिढ्या करत आहेत. संतोष डोर्लेकर एक पारंपरिक मासेमार असून गेली 25  वर्ष मासेमारी करत आहेत . २०१८ साली रिलायन्स फाऊंडेशनच्या अधिकार्‍यांशी काही कामानिमित्त वसंत यांची भेट झाली. पारंपरिक पद्धतीने मासेमारी करताना येणार्‍या समस्यांची चर्चा झाल्यावर त्यांनी इतर मासेमार्‍यांचे संपर्क क्रमांक व स्वतः  चा संपर्क क्रमांक रिलायन्स फाऊंडेशनच्या सागरी हवामानाच्या ध्वनि संदेशाशी जोडले गेले.

संतोष डोर्लेकर रिलायन्स फाऊंडेशनच्या  सागरी हवामान सेवेसोबत 4  वर्षापूर्वी जोडले गेले. रिलायन्स फाऊंडेशनकडून मिळणारी हवामानाची माहिती व हवामानाची माहिती मिळवण्यापूर्वीचा मासेमारी व्यवसाय यातला फरक सांगताना संतोष डोर्लेकर म्हणतात,’’आमचे आयुष्य समुद्रात मासेमारी करण्यात गेले. लहान वयातच कुटुंबातील इतर सदस्यांच्या सोबत मासेमारीसाठी जाण्यास सुरवात केली. त्यावेळेस सागर हवामानाची माहिती देणारी कोणतीच यंत्रणा नव्हती तरी सुद्धा अनुभवाने  हवामानाचा  अंदाज लावत जीव मुठीत घेऊन मासेमारी करत असू. कित्येक वेळा अंदाज चुकल्याने धोकादायक परिस्थितीचा सामना करावा लागला. रिलायन्स फाऊंडेशनकडून माहिती मिळायला लागल्यापासून आम्ही एक दिवस आधीच समुद्रामध्ये जायचं की नाही याचा निर्णय घेऊ लागलो.संभाव्य धोके टाळणे शक्य झाले. ज्या मासेमार्‍याना इंटरनेट किंवा मोबाइल चांगल्या पद्धतीने हाताळता येत नाही अश्यांसाठी तंत्रद्यानाच्या माध्यमातून रिलायन्स फाऊंडेशनकडून मिळणारी माहिती उपयुक्त ठरत आहे.

रिलायन्स फाऊंडेशनकडून वार्‍याचा वेग जास्त आहे किंवा हवामानाची  परिस्थिति कधीही बदलू शकते अशी माहिती मिळते तेव्हा आम्ही मासेमारीसाठी जात नाही त्यामुळे आमचा वेळ,श्रम आणि जीवन तसेच अत्यंत महत्त्वाचे इंधन बचत होते. वार्‍याचा वेग अचानक बदलला तर बोट अर्ध्या मार्गातून परत घ्यावी लागते त्यामुळे डीझेलच नुकसान होत. गेल्या वर्षी अंदाजे 20000 ची बचत ही रिलायन्स फाउंडेशनच्या सागरी हवामानाच्या महितीमुळे झाली . साधारणतः एका फेरीला 50 लीटर डिझेल  लागते. या वर्षी 4 वेळेस वारा जास्त आहे अशी माहिती रिलायन्स फौंडेशांकडून मिळाली त्यामुळे आम्ही त्यवेळेस बोट समुद्रात घातली नाही . त्यामुळे साधारणतः 20000  इंधनाची बचत झाली

रिलायन्स फाऊंडेशन व INCOIS यांचे आभार मानून ही सेवा अशीच अविरत चालू ठेवावी,अशी विनंती संतोष डोर्लेकर यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा